मुदत ठेव योजना (FD)

व्यवसाय असो अथवा नोकरी, अनेकदा पैसे येतात आणि मुठीतल्या वाळूसारखे हातातून कधी निघून जातात तेच कळत नाही. परिणामी, जमवलेली बचतही अशीच निघून जाते. म्हणूनच हे पैसे एका सुरक्षित ठिकाणी गुंतवून ठेवायला हवे आणि त्यासाठीच 

श्री. रेणुकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेची मुदत ठेव योजना आहे आपल्या सेवेत ज्यात रक्कम सुरक्षित राहते व आकर्षक व्याजही मिळते. आपली बचत नाहक खर्च होऊ नये यासाठी बचत ठराविक कालावधीसाठी मुदत ठेव म्हणून ठेवणे एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे!तुमची बचत सुरक्षित ठेवणे आणि मुदत ठेवीवर जास्तीत जास्त परतावा देणे ही आम्ही आमची जबाबदारी समजतो. आमच्या मुदत ठेव योजनांचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.

ठेवींवर आकर्षक व्याज दर

d8e4c4ce13b7eeaf02ce0c3fce3134535880a052be97eee2632b763e843867f3-removebg-preview

46 दिवस ते 3 महिने

7%

d8e4c4ce13b7eeaf02ce0c3fce3134535880a052be97eee2632b763e843867f3-removebg-preview

4 महिने ते 6 महिने

8%

d8e4c4ce13b7eeaf02ce0c3fce3134535880a052be97eee2632b763e843867f3-removebg-preview

7 महिने ते 12 महिने

9%

d8e4c4ce13b7eeaf02ce0c3fce3134535880a052be97eee2632b763e843867f3-removebg-preview

13 महिने ते 24 महिने पुढे

10%

d8e4c4ce13b7eeaf02ce0c3fce3134535880a052be97eee2632b763e843867f3-removebg-preview

८५ महिने दाम दुप्पट

* ज्येष्ठ नागरिक /स्वातंत्र्य सैनिक /विधवा/शारीरिक अपंगत्वसाठी 0.5 % वाढ *

आवर्तक ठेव योजना (RD)

उद्याच्या मोठ्या गरजा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजपासूनच छोटी-छोटी बचत करायला हवी. पण अनेकदा बचत नक्की करायची कशी हेच कळत नाही. मात्र आता काळजी नाही, श्री.रेणुकादेवी पतसंस्थेच्या आवर्तक ठेव योजनेंतर्गत तुम्ही दर आठवड्याला किंवा दर महिन्याला काही ठराविक रक्कम ठराविक काळासाठी संस्थेत जमा करा व ठराविक कालावधीनंतर तुम्हाला तुमची मुद्दल व त्यावर आकर्षक व्याज अशी एकत्रित रक्कम मिळेल.

व्यावसायिक असो वा नोकरदार, स्वतःला शिस्त लावा बचतीची, आजच पूर्ण करा स्वप्नं उद्याची. आवर्तक ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.

पिग्मी/ दैनंदिन ठेव योजना

आजच्या छोट्याश्या गुंतवणुकीतून भविष्याची मोठी बचत तयार होते. म्हणूनच स्वतःला छोट्या छोट्या बचतीची सवय लावायला हवी. याच विचारातून आम्ही एक तरतूद केली आहे. रोजंदारीवर काम करणारे कामगार, लहानसहान व्यापारी आणि शेतकऱ्यांना बचतीची सवय लागावी तसेच त्यांच्या लग्न, घर खरेदी, वाहन खरेदी अशा मोठ्या भांडवली गरजा वेळीच भागवण्यासाठी मोठी रक्कम साठवली जावी म्हणून श्री.रेणुकादेवी नागरी पतसंस्थेने पिग्मी अर्थात दैनंदिन ठेव योजना सुरू केली. या योजनेत रोजच्यारोज अगदी कमीत कमी रक्कम गुंतवून उद्या एकत्रितपणे एका मोठ्या रकमेचा तुम्ही लाभ घेऊ शकता.

छोट्या छोट्या बचतीतून पूर्ण करा स्वप्नांचा महासागर! पिग्मी / दैनंदिन ठेव योजनेबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.

दाम दुप्पट योजना

मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मिळकतही हवी मोठी! आज तुम्ही तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहात, त्यालाच जोड द्या आकर्षक व्याजदराची. आपल्या सेविंग्स श्री.रेणुकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या दाम दुप्पट योजनेत गुंतवा. जेणेकरून, ठराविक काळानंतर तुमची रक्कम होईल दुप्पट आणि तुमचं हवं ते स्वप्न पूर्ण होईल अपेक्षेपेक्षा लवकर!

आमच्या दाम दुप्पट योजनेंतर्गत ८५ महिने तुम्ही गुंतवलेली रक्कम दुप्पट होऊन मिळते. उदा. तुम्ही रु. 1 लाख गुंतवले तर ८५ महिन्यानंतर तुम्हाला रु. २ लाख मिळतात. मग आजच निर्णय घ्या, आपल्या स्वप्नांच्या दिशेनं पहिलं पाऊल उचला. दाम दुप्पट योजनेबाबत अधिक माहितीसाठी आजच आपल्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा.