वैयक्तिक कर्ज
या व्यवहारी जगात लहानसहान आर्थिक अडचणींमुळे मोठं नुकसान सोसावं लागतं. अनेकदा आपल्याला काही वैयक्तिक कारणास्तव अल्पावधीसाठी पैशांची गरज असते. मात्र वेळीच पैसे न मिळाल्याने मोठे नुकसान सोसावे लागते.
व्यावसायिक कर्ज
व्यवसाय म्हटला की हाताशी भांडवल हवं असतं, मात्र या व्यवहाराच्या जगात अडकलेले पैसे वेळेवर मिळतीलच याची खात्री नाही. श्री.रेणुकादेवी नागरी सहकारी पतसंस्था वतीने तुम्हाला व्यवसायिक कर्ज तात्काळ उपलब्ध करून देण्याची हमी आम्ही देतो.
पगार तारण कर्ज
आपल्या तात्काळ गरजा भागवणं असो किंवा आपली छोटी-मोठी स्वप्नं असोत, पैसा हाताशी हवाच असतो. परंतु सर्वसामान्य नोकरदार बंधूंना आपल्याच कामाच्या पैशांसाठी अर्थात पगारासाठी महिनाभर वाट पाहावी लागते. गरजेच्या वेळी हाताशी पैसे नसल्यास मोठी तारांबळ होते.
सोने तारण कर्ज
पैशांची गरज ही कधी सांगून येत नसते. पण अशा अचानक ओढवलेल्या अडचणीत पैशांचं सोंग आणता येत नाही. तुमच्या अडचणीच्या काळात श्री.रेणुकादेवी नागरी सहकारी पतसंस्था तुमच्या पाठीशी उभी राहते खंबीरपणे.
वाहन कर्ज
आजच्या धावपळीच्या जगात आपल्याकडे स्वतःचं वाहन असेल तर आयुष्य सुखकर आणि सोयीस्कर होतं. म्हणून तर, वाहन हे आजच्या काळात केवळ एक प्रतिष्ठेचं साधन राहिलं नसून एक अत्यावश्यक गरज झाली आहे.
मॉरगेज कर्ज
अडचण मोठी असो अथवा लहान, तुमच्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणात श्री. रेणुकादेवी नागरी सहकारी पतसंस्था देईल तुमची साथ! तुमच्या अडचणीच्या काळात आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ मॉरगेज कर्ज, जेणेकरून तुमच्या गरजा व्हाव्या वेळेत पूर्ण!
महिला बचत गट कर्ज
महिला सबलीकरण, महिला व्यावसायिकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी, श्री.रेणुकादेवी नागरी सहकारी पतसंस्था कायम तत्पर असते आणि म्हणूनच संस्था बचत गटांना देते महिला बचत गट कर्ज.