About Us
जालना भागातील सर्वसामान्यांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने 1996 साली तरुण विचारांच्या तरुणांनी सुरु केलेल्या श्री.रेणुकादेवी नागरी सहकारी पतसंस्था बघता-बघता अधिक सदस्यांचा महापरिवार झाला आहे. येणाऱ्या प्रत्येकाला जिव्हाळ्याने, आपुलकीने जपणं आणि उत्तम सेवा देणे हे आद्य कर्तव्य समजून प्रामाणिक प्रयत्न करत पतसंस्थेच्या 10 शाखा जालना जिल्ह्यात आहेत.
ग्राहकांना मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, SMS बँकिंग, RTGS,NEFT,QR CODE इ. सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे निरंतर प्रगतीचे साधन समजून काळानुरूप कार्यपद्धतीत बदल करत सोसायटीने नेहमीच ग्राहक सेवेचे नव-नवीन मानदंड प्रस्थापित केले आहेत. भारतात कोठेही पैसे पाठवायची आणि स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध आहे. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन ठेवी व कर्जाकरिता विविध पर्याय उपलब्ध करून देत संस्था अल्प कालावधीतच ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.